महिलांनो, स्वतंत्रपणे फिरा देश विदेशात

travel
काही काळापर्यंत मुली महिलांना घराबाहेर पडायचे तरी कुणीतही सोबत असावे अशी गरज भासायची. रात्री अपरात्री फिरण्याची तर बातच सोडा. काळानुरूप या परिस्थितीतही बदल होत गेलाय. आज मुलीबाळी एकटयादुकट्या वेळी अवेळी फिरताना दिसतात. नोकरीनिमित्ताने अथवा अन्य कारणांनी परगांवी एकट्या राहतानाही दिसतात. मात्र अजूनही देश विदेशात भटकंती करताना कुणीतरी हवे ही भावना आहेच. मात्र अनेकींना प्रवासाची आवड आहे, सवड आहे आणि आर्थिक तरतूदही आहे तरीही बरोबर कुणी नाही म्हणून मनसोक्त भटकंतीचा आनंद घेता येत नाही. अशा महिलांची देशविदेशातील भटकंतीची स्वप्ने पुरी करण्यासाठी अनेक वुमन ट्रॅव्हल क्लब सुरू झाले आहेत. हे कलब फक्त महिलांसाठीच आहेत व बदलत्या जीवनशैलीत एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या रूपाने महिला विश्वाला उपलब्ध झाला आहे.

या कलब मध्ये नोंदणी करून महिला एकट्यादुकट्यानेही प्रवासाची मजा लूटू शकतात म्हणजे तुमच्या ओळखीच कुणी नसले तरी अन्य महिला तुमच्या सोबत असतात. हे क्लब महिलांसाठी अनेक अॅक्टीव्हीटीज तसेच अॅडव्हेंचर ट्रीपही आयोजित करत आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो आहे. नोकरी करणार्‍या, शिकत असलेल्या मुली, गृहिणी अशा सर्व थरातील महिलावर्गात यामुळे एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड वाढतो आहे व महिला वर्गाचा आत्मविश्वासही दुणावला आहे. जीवनातील प्रत्येक क्षण उपभोगण्याची संधी या क्लब्जमुळे महिलांना मिळते आहे.

वुमन ऑन वंडरलस्ट , वॉव ट्रॅव्हल क्लब असेच क्लब असून त्यांच्यातर्फे वेळोवेळी भारत भ्रमण व परदेश टूर पॅकेज दिली जात आहेत. यात क्लब सदस्य महिला अनेक सुंदर पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. मलेशिया, स्वित्झर्लंड, लडाख, मुंबई, इजिप्त अशा अनेक ठिकाणांसाठी त्यांच्यातर्फे पॅकेज आहेत तसेच साहसप्रेमी महिलांसाठी ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग ची सुविधाही दिली जात आहे. फ्रान्स अमेरिका, बोरॅनो अशा ठिकाणीही त्यांच्या सहली आहेत. २००५ पासून दरवर्षी त्यांच्यातर्फे ७० ते ८० टूर आयेाजित केल्या जात आहेत.

गर्ल्स ऑन द गो क्लब हा मुंबईतील क्लब वुमन सोलो क्लब म्हणून ओळखला जातो. येथेही महिलांसाठी अनेक युनिक पर्यटनस्थळांची पॅकेजेस दिली जातात. दुर्गम नागालँड, स्पेन, अंटार्टिका सह देशविदेशात त्यांच्या टूर्स नित्यनेमाने जातात. दिवा ओडीसीज हा लग्झरी हॉलीडे क्लब थोडा वेगळा आहे. म्हणजे येथे महिला आपल्या मुलांनाही बरोबर आणू शकतात. साधारण १८ महिलांचा एक ग्रूप केला जातो. हा क्लबही टांझानिया झांझिबार मधील अभयारण्ये, बाली, ऑस्ट्रेलिया, कॅरेबियन आयलंडस, इटली अशी भटकंती करण्याची सोय करून देतो.

वुमन ऑन क्लाऊडस हा दिल्लीतील क्लब पूर्ण जगभर त्यांची सेवा देतो. त्यांचा मुख्य बेस पर्यटन हाच असला तरी हृषिकेश येथील गंगेत राफ्टिंग, गोकर्ण महाबळेश्वर येथे योगा मेडिटेशन, निसर्गरम्य उत्तराखंड, गढवाल मधील पर्वत श्रृंखला, घनदाट जंगलातून भटकंती असेही उपक्रम ते राबवित आहेत.

Leave a Comment