जगातील सर्वात वयोवृद्ध शार्पशूटर ८१ वर्षाची आजी

sharp-shooter
वयोवृद्ध लोकांना आज दूरचे बघण्यासाठी चष्म्याची गरज पडत असल्याचे आपल्याला माहीतच आहे. पण बागपत जिल्ह्यातील जोहरी गावात राहणारी ८१ वर्षीय चंद्रो तोमर तरूणींसाठी आदर्श ठरत आहे. ८१ वर्षाची चंद्रो दादी शार्प शूटर म्हणून लोकप्रिय झाली आहे. जगातील सर्वात वयस्कर शार्पशूटर चंद्रो दादी आहे. त्यांच्याविषयी मजेदार गोष्ट म्हणजे त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी शूटींग प्रॅक्टीस सुरू केली होती.

एवढेच नाहीतर २५वा राष्ट्रीय शूटींग चॅम्पियन किताबही चंद्रो दादीला मिळाला आहे. भलेही चंद्रो दादी ८१ वर्षाची असेल पण त्यांच्या निशाना आजही योग्य ठिकाणी लागतो. चंद्रो दादी यांचे म्हणणे आहे की, त्यांना लहानपणापासूनच निशाना लावण्याची आवड होती. पण जीवनाच्या या धावपळीत ते सर्व मागे राहून गेले. पण ही आवड त्यांच्यात कुठेतरी टिकून होती. त्या फक्त संधीच्या शोधात होत्या.

वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांना त्यांच्यातील गुण दाखवण्याची संधी मिळाली, त्या त्यांच्या नातीला घेऊन भारतीय नेमबाज डॉक्टर राजपाल सिंग यांच्याकडे घेऊन गेल्या. तिथे लहान मुलांना नेमबाजी करताना पाहताना त्यांनीही बंदूक उचलली आणि एकेठिकाणी योग्य निशाना लावला.

दादीचा निशाना अचूक ठिकाणी लागल्याचे पाहून डॉक्टर राजपाल आश्चर्यचकीत झाले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, दादी तुम्ही शूटींग सुरू करा. त्यानंतर दादीचा निशानेबाजीचा प्रवास सुरू झाला. दादी चंद्रो सांगतात की, सुरुवातील त्यांचे हात थरथरत होते. पण १५ दिवसांनंतर सर्व ठिक झाले. त्यानंतर त्यांचे फोटो वृत्तपत्रांमध्ये छापून आले. त्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना प्रेरित केले. आणि दादी निशानेबाजीसाठी पुढे आल्या. आता दादी गावातील लहान मुलांना, मुलींना शूटींग शिकवतात.