गुरूवारी कोरियन जायंट सॅमसंगने त्यांचा नवा गॅलॅक्सी जे थ्री हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनचे खास वैशिष्ठ्य म्हणजे कंपनीने त्याला दिलेला बाईक मोड. या मुळे बाईक चालविताना येणारे कॉल प्री रेकॉर्डेड मेसेजेसच्या माध्यमातून रिप्लाय करता येणार आहेत तसेच रायडर त्याला महत्त्वाचे असलेले कांही कॉन्टॅक्टस मार्कही करू शकणार आहे. तसेच रायडरला नोटिफिकेशनही मिळू शकणार आहेत. हा फोन चीनमध्ये गेल्या वर्षीच लाँच केला गेला आहे.
खास बायकर्ससाठी सॅमसंगचा गॅलॅक्सी जे थ्री स्मार्टफोन लाँच
हा फोन ड्युअल सिम आहे. त्याला ५ इंची एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले,१.५ जीबी रॅम ८ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड ५.१ लॉलिपॉपवर आधारित सॅमसंग टचविज यूआय ओएस, ८ एमपीचा एलईडी फ्लॅशसह रियर तर पाच एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. कनेक्टीव्हिटीसाठी फोरजी थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ मायक्रो यूएसबी अशी ऑप्शन्स आहेत. हा फोन स्नॅपडीलवर ८९९० रूपयांत उपलब्ध आहे.