किंगफिशरच्या लोगोचाही लिलाव होणार?

king
मुंबई – उद्योजक विजय माल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सच्या लोगोचाही लिलाव पुकारला जाणार असल्याच्या वृत्ताला एसबीआय कॅप ट्रस्टी कार्पोरेशनकडून दुजोरा दिला गेला आहे. या लोगोसाठी बेस प्राईज ३६६.७ कोटी ठेवली गेली असून बोली लावण्याची मुदत ३० एप्रिल पर्यंत आहे. या संदर्भातली नोटीस मंगळवारीच जारी केली गेल्याचेही समजते.

फ्लाय किंगफिशर, उडणारा किंगफिशर पक्षी व फ्लाय वुइथ द गुड टाईम्स असा वर्ड मार्क असणार्‍या या लोगोशी किंगफिशरची ब्रँड व्हॅल्यू जोडली गेली आहे. अर्थात हा लोगो कोण घेणार व त्याचा दुसर्‍या एअरलाईनला काय फायदा होणार हे समजू शकलेले नाही. कारण किंगफिशर विमान कंपनी बंद पडलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिअर उद्योजक हा लोगो खरेदी करू शकतील कारण त्यामुळे त्यांना बिअर ब्रँड व्हॅल्यू वाढविता येईल. अर्थात यामध्ये ब्रेवरीज कडून कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यताही नाकारली जात नाहीये.

Leave a Comment