होऊ द्या खर्च; ६ हजार ६०० कोटींचे लग्न

wedding
मॉस्को : रशियात आपल्या मुलाच्या विवाहात कझाकिस्तानचे अब्जाधीश मिखाइल गुस्तेरीव यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. २८ वर्षाच्या सईद गुस्तेरीवने नुकतेच २० वर्षांच्या खादिजा उजहाखोवाशी विवाह केला आहे. हे जगातील पहिले एक अब्ज डॉलर्सचे लग्नसोहळा असल्याचे सांगितले जात आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, विवाहासाठी ६ हजार ६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

ब्रिटनच्या हॅरो आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून तेल सम्राट मिखाइल यांचा मुलगा सईद शिक्षण घेतले आहे. त्याची पत्नी वैद्यकीय शाखेची विद्यार्थींनी आहे. विवाह सोहळा २६ मार्च रोजी मॉस्कोच्या लक्झरी रेस्तरॉंमध्ये पार पडला. पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी जेनिफर लोपेज आणि एन्रीक यांसारख्या हॉलीवूड गायिकांना बोलवण्यात आले होते. यापूर्वी जेनिफरने २०१३ मध्ये १० लाख डॉलरपासून तुर्कमेनिस्तानचे अध्यक्षांच्या वाढदिवसाच्या पार्टीत कलेचे सादरीकरण केले होते. रशियातील प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बेयोन्स व एल्टन जॉननेही विवाहा सोहळ्यात गायन आणि डान्स केले.

याबाबतचे छायाचित्र प्रसिध्द करण्यात आलेले नाही. भव्य कार्यक्रमाच्या स्थळाबाहेर रोल्स रॉयससारखी शेकडो महागडी आणि लक्झरी कार उभी होती. ६०० पाहुण्यांसाठी यूरोपियन खाद्यपदार्थ बनवण्यात आले होते. दुसरीकडे पार्टीसाठी मोठ्ठा केक मागवला गेला होता.

वधू खादिजाने १६ लाखांचा डायमंड एली साब गाऊन परिधान केला होता. हा गाऊन खास पॅरिसमधून मागवला गेला होता. ड्रेसचे वजन १२ किलोग्रॅम होते. इतक्या भरदार ड्रेस सांभाळण्यासाठी वधूबरोबर अनेक सहायक होते. खादिजाच्या डोक्यावर हि-यांचे मुकूट आणि गळ्यात हि-यांचे पेण्डण्ट होते.

Leave a Comment