लंडन रस्त्यावर सोन्याच्या कार- पादचारी अचंबित

sonecar
लंडन- लंडनच्या रस्त्यावर कांही दिवसांपासून दिसत असलेला सोन्याच्या कारचा ताफा येणार्‍या जाणार्‍यांना अचंबित करत आहे त्याचबरोबर युकेत या ताफ्यासह आलेला सौदीचा प्रवासीही चांगलाच चर्चेत आला आहे.

हा प्रवासी म्हणजे सौदीचा तुर्की बिन अब्दुल्ला असून लंडन मध्ये विकएंड साजरा करण्यासाठी येताना त्याने बरोबर सुपरकार्सचा ताफाच आणला होता. या सर्व कार गोल्ड प्लेटेड आहेत आणि कतार एअरलाईन्सने त्या लंडन येथे आणण्यासाठी १९ कोटी रूपये खर्च केले गेल्याचेही समजते. या कार्समध्ये मर्सिडीज, बेंटले फ्लाईंग, रोल्स रॉईस, लोम्बार्गिनी अवेन्टेअर या कार्सचा समावेश आहे. लंडनच्या केसिंग्टन भागात या कार्सचा ताफा रस्त्यावरून धावला तेव्हा रस्त्यावरचे सर्वच लोक थक्क होऊन पहात राहिल्याचे सांगितले जात आहे.

लंडनच्या फाईव्ह स्टार मेडेरियन ओरिएंटल हॉटेलबाहेर त्या पार्क केल्या होत्या तेथेही त्या पाहण्यासाठी लोक गर्दी करत होते. या कार्सची प्रत्यक्षातली किंमत १० कोटींहून अधिक आहेच मात्र त्यावर सोन्याचा पत्रा चढविण्यासाठी आणखी किती खर्च केला गेला ते समजू शकलेले नाही.

Leave a Comment