महसूलात आयपीएलच अव्वल

iplt20
सध्या टिट्वेंटीचा भर जोरात आहे आणि पाठोपाठ आयपीएलचे सामनेही प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र या दोन्ही स्पर्धातून ब्रॉडकास्टींग कंपन्यांना जाहिरातीतून तसेच अन्य मार्गाने मिळणारा महसूल तपासला तर आयपीएलचा वर्ल्ड कप टिट्वेंटीवर वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कप टिट्वेंटीतून स्टार इंडिया प्रा.लिमि.ने ४०० कोटींचा महसूल गोळा केला आहे मात्र तिकीटविक्रीतून मिळालेल्या रकमेची माहिती अद्यापी मिळालेली नाहंी.

या तुलनेत आयपीएल आठ साठी ब्रॉडकास्ट सोनी पिक्चर्स नेटवर्कने जाहिरातीतून १ हजार कोटी रूपये मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. टिट्वेंटी वर्ल्ड कप पाठोपाठ होणार्‍या आयपीएल स्पर्धेसाठी प्रायोजकांकडून चांगला प्रतिसाद असून यंदाच्या सीझनमध्ये महसूल ११०० कोटींवर जाईल असा प्राथमिक अंदाज आहे. याचाच अर्थ टिट्वेंटी पेक्षा हा महसूल तिप्पट आहे.

टिट्वेंटी२०१४ मध्ये ३०० कोटींचा महसूल मिळाला होता तो यंदा ४०० कोटींवर गेला आहे. आयपीएल सेव्हनमध्ये ८०० कोटी, आयपीएल २०१५ मध्ये १ हजार कोटी तर आयपीएल २०१६ मध्ये हाच महसूल ११०० कोटींवर जाणार आहे. त्यासाठीचे बुकींगही अगोदरच झाले असल्याचेही समजते.

Leave a Comment