जिओनीने आणला दोन डिस्प्लेवाला डब्ल्यू ९०९ फोन

jionee
जिओनीने दोन डिस्प्लेवाला अँड्राईड फ्लिपफोन डब्ल्यू ९०९ नावाने बाजारात सादर केला आहे. या फोनला दोन टन स्क्रीन बरोबरच फिजिकल की बोर्डही दिला गेला आहे. फिंगरप्रिंट सेन्सरसह असणारा डब्ल्यू ९०९ हा जगातला पहिलाच फ्लिपफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या फोनसाठी ड्युअल सिम, अँड्राईड ५.१ लॉलिपॉप, यूसबी टाईप सी पोर्ट, ४.२ इंचाचे दोन आयपीएस टच डिस्प्ले, बाहेरच्या डिस्प्लेला २.५ डी ग्लास, ४ जीबी रॅम ६४ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ पर्यंत वाढविण्याची सुविधा, एलईडी फ्लॅशसह १६ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, फोरजी, एलटीई, ब्ल्यू टूथ, जीपीएस कनेक्टीव्हिटी ऑप्शन्स दिली गेली आहेत. फोनच्या बॅकसाईडला फिंगरप्रिंट सेन्सर असून फोन ०.३८ सेकंदात अनलॉक होतो.

शिवाय फिजिकल टी नाईन कीबोर्ड, नेव्हीगेशन, कॅमेरा ऑन करण्यासाठीची बटणेही दिली गेली आहेत. ऑन स्क्रीन कीबोर्डही आहेच. हा फोन रोझ गोल्ड रंगात उपलब्ध असून त्याची किंमत ३९९९ युआन म्हणजे ४१ हजार रूपये आहे. या फोनसाठी चीनमध्ये प्री ऑर्डर करता येणार आहे.

Leave a Comment