आरबीआय आणणार बाबासाहेबांच्या १२५व्या जयंतीनिमित्त विशेष नाणे

babasaheb
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त १० रुपयाचे विशेष नाणे जारी करण्यात येणार आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०१६ रोजी १२५वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्तानेच रिझर्व्ह बँकेकडून हे विशेष नाणे जारी करण्यात येणार आहे. दहा रुपयांच्या या नाण्याच्या एका बाजूला बाबासाहेबांची प्रतिमा असणार आहे. तसेच इंडिया आणि रुपयाचे चिन्हही या नाण्यावर असणार आहे. दरम्यान, बाबासाहेबांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment