सर्च इंजिन गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना २०१५ साली कंपनीकडून १०.०५ कोटी म्हणजे ६६३.७ कोटी रूपयांचे पॅकेज दिले गेले आहे. या रकमेतील ६६२ कोटी स्टॉक ऑप्शन स्वरूपात दिले गेले आहेत शिवाय गतवर्षात ६५२,५०० डॉलर्स इतका पगारही त्यांना दिला गेला आहे.
सुंदर पिचाईना मिळाले ६६३ कोटींचे पॅकेज
मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीत त्यांना गुगलचे मालकी हक्क असलेली कंपनी अल्फाबेटने १९.९ कोटींचे मर्यादित स्टॉक ऑप्शन दिले होते. हे स्टॉक विकण्यसाठी ठराविक मुदत असते आणि असे स्टॉक मिळणे ही सीईओसाठी सर्वात मोठी ग्रँट समजली जाते. कारण त्याची माहिती स्टॉक एकस्चेंजला द्यावी लागते. त्याचबरोबर कधीही विकता येतील असे १.१६ कोटी डॉलर्सचे स्टॉक्सही पिचाई यांच्याकडे आहेत. अल्फाबेट असे स्टॉक दोन वर्षातून एकदा देते.
कंपनीचे अध्यक्ष एरिक स्मिथ यांनाही २०१५ मध्ये ८०.४ लाख डॉलर्स चे पे पॅकेज दिले गेले असून त्यातील ६० लाख डॉलर्स कॅश बोनस म्हणून दिले गेले आहेत.