रिलायन्स २०० रूपयात देणार ७५जीबी ४जी इंटरनेट डेटा

reliance
नवी दिल्ली : मोबाईलमध्ये ४जी इंटरनेट सूविधा देऊन वोडाफोन, एअरटेल यांसाऱख्या कंपन्यांनी बाजी मारल्यानंतर या कंपन्यांना टक्कर देण्याची जोरदार तयारी रिलायन्सने देखील केली आहे. कंपन्यांच्या या स्पर्धेत ग्राहकांचा फायदा होणार एवढे मात्र निश्चित असल्यामुळे रिलायन्स अवघ्या २०० रूपयांच्या सिमकार्ड खरेदीवर चक्क ७५जीबी ४जी इंटरनेट डेटा देणार आहे.

रिलायन्सच्या या नव्या ऑफरचे नाव जिओ असे असून, नव्या ऑफरनुसार ग्राहकाला २०० रूपयांच्या सिमकार्डच्या बदल्यात ७५जीबी म्हणजेच सुमारे ४ हजार ५०० मिनिटांच्या आसपास इंटरनेट डेटा वापरण्यास मिळणार आहे. ही ऑफर सध्याही उपलब्ध आहे. मात्र, ती रलायन्स कर्मचाऱ्यांसाठी आहे. या ऑफरचा लाभ लवकरच ग्राहकांनाही मिळणार आहे.

कशी आहे रिलायन्सची ऑफर

– रिलायन्स जिओ ४जी सुविधा देशभरात उपलब्ध असणार.
– २०० रूपयांच्या सिमसोबत ३ महिन्याचा टॉकटाईम आणि ७५जीबी इंटरनेट डेटा मिळणार.
– महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांना हा डेटा पहिल्या तिन महिन्यातच वापरावा लागणार आहे.
– दरम्यान, या ऑफरच्या सिमकार्ड्सची विक्री कधी सुरु होईल, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.
– भारतात हायस्पीड मोबाईल इंटरनेट सेवा आणि फोन सेवा जिओकडून देण्यात येईल.

दरम्यान, रिलायन्सने ही ऑफर लॉंच केल्यास त्याचा इतर कंपन्यांवर मोठा परिणाम होईल, असे आर्थिक वर्तूळात बोलले जात आहे. मात्र, कंपन्यांमध्ये अशी स्पर्धा सुरू झाल्यास त्याचा ग्राहकांना अधिक फायदा मिळू शकणार असल्याने या ऑफरच्या चर्चेनेच मार्केटमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment