महाराष्ट्र निर्यातीमध्ये सर्वात आघाडीवर

assocham
मुंबई – २०१४-१५मध्ये देशातून वस्तू आणि सेवा यांची एकत्रित निर्यात फक्त दोन राज्यांमध्ये जास्त झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात राज्य आघाडीवर असून या दोन्ही राज्यांचा वस्तू आणि सेवा निर्यातीमध्ये एकूण हिस्सा ४६ टक्के आहे. ही माहिती उद्योग संघटना असोचेमच्या एका अहवालामध्ये देण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यानंतर निर्यातीमध्ये तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. देशातून झालेल्या एकूण निर्यातीमध्ये या पाच राज्यांचा हिस्सा ६९ टक्के आहे. २०१४-१५ मध्ये निर्यात उत्पन्न जवळपास ३१० अब्ज डॉलर (२०,५६५ अब्ज रुपये) राहिले आहे.

या दरम्यान महाराष्ट्रातून एकूण निर्यात ७२.८३ अब्ज डॉलर (४८३१ अब्ज रुपये) राहिली आहे. सर्वात जास्त निर्यात करून महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर राहिले आहे. दर या दरम्यान गुजरातमधून वस्तूंची निर्यात ५९.५८ अब्ज डॉलर (३९५२ अब्ज डॉल रुपये) राहिली आहे. गुजरातसारख्या लहान राज्याने निर्यातीमध्ये दुसरे स्थान फटकावले आहे.

Leave a Comment