पुरूषांच्या या प्रोफेशन्सवर महिला असतात लटटू

army
असे म्हटले जाते की महिला ज्या प्रकारचे कपडे वापरतात, त्यावरून त्या कशा प्रकारच्या असतील याचा अंदाज बांधता येतो. अर्थात हा पुरूष जमातीचा मोठा गैरसमजही असू शकतो. पुरूषांची कर्तबगारी मात्र नांव, प्रसिद्धी आणि वलय यावरून जोखली जाते. येथेही महिलांना कोणत्या प्रकारच्या प्रोफेशनमधील पुरूष अधिक भावतात याचा अंदाज जर सरसकट बांधला तर तो हमखास चुकीचा निघू शकतो. महिलांसाठी पुरूषाची कमाई किती आहे ही महत्त्वाची बाब असतेच पण म्हणून जादा पैसा कमावणारे पुरूष त्यांना अधिक आवडतात हे म्हणणे धाडसाचे होईल. सर्वेक्षणानुसार महिला वर्ग ज्या प्रोफेशन्सवर लटटू असतो त्यात सर्वात आघाडीवर आहेत मिलीट्री ऑफिसर्स.
pilot
लष्करी अधिकारी बहुतेक महिलांसाठी चार्मिंग पर्सन्स असतात. त्यांचे धाडस, फिटनेस, स्मार्टनेस यामुळे ते महिलांसाठी किंवा युवतींसाठी प्रिन्स चार्मिंग असतात. शिस्त, आत्मविश्वास आणि विनोदबुद्धी यामुळेही ते अन्य पुरुषांपेक्षा वेगळे व अधिक उठावदार वाटतात. आर्मी ऑफिसर्स नंतर नंबर येतो पायलटसचा. पायलट लोकही महिला वर्गाच्या विश लिस्टमध्ये टाँपवर असतात. दिसायला हँडसम नसले तरी युनिफॉर्ममुळे हँडसम दिसणार्‍या या जमातीचा पगारही हँडसम असतो. त्यांची निर्णयक्षमता आणि अत्यंत आकर्षक प्रोफेशन यामुळे महिला वर्गाला त्यांचे मोठे आकर्षण वाटते यात पायलटचा कांही दोष नाही.

शेफ हेही महिलांसाठी असेच आकर्षक प्रोफेशन आहे. जेवण बनविणारा पुरूष प्रत्येक महिलेच्या स्वप्नातील राजकुमार असतो असे म्हणणे धाडसाचे असले तरी खास आपल्यासाठी कुणीतरी कांही खास करून खिलवतेय ही भावना महिलांना समाधान देते. त्यातही केक पेस्ट्रीज बनविणारे शेफ महिलांना फारच पसंत असतात. तमाम महिला वर्गाला फोटोचे आकर्षण असते. अनेकींना फोटो क्लिक करण्यातही मोठा आनंद मिळतो. त्यामुळेच फोटोग्राफी हेच ज्यांचे प्रोफेशन आहे त्यांच्यावर महिला फिदा झाल्या तर त्यात नवल ते काय? कारण फोटोग्राफर्सची ही जमात छोट्यात छोट्या गोष्टीतही सौंदर्य शोधते.त्यात त्यांना प्रवासाचीही आवड असेल तर मग घी मे शक्कर!
chef
ड्रींक एक्स्पर्ट म्हणजे बारटेंडर हे प्रोफेशन असणारे पुरूष ही महिलांच्या आकर्षणाचे केंद्र असतात. त्यांची विनोदबुद्धी कमालीची शार्प असते असे संशोधन सांगते. अतिशय शांतपणे ड्रींक सर्व्ह करणारे हे बारटेंडर आतून रोमॅटिक आणि टॅलेंटेड असतात व संधी मिळताच त्यांचे टॅलेंट दाखविण्यातही माहिर असतात. डॉक्टर हे प्रोफेशनही महिलांना आकर्षक वाटते पण त्यामागचे मुख्य कारण असते ते आरोग्याची काळजी राहात नांही हे. अर्थात डॉक्टर आणि तोही प्रसिद्ध असेल तर त्याच्यावरही अनेक जणी लटटू होतात.

संगीतकार हे असेच एक प्रोफेशन ज्याबद्दल महिलांना कमालीचे आकर्षण वाटते. म्हणजे गायकापेक्षाही त्यांना संगीतकार अधिक आवडतात. त्यांची एनर्जी, संगीताशी असलेला लगाव आणि गहन विचारात बुडालेला चेहरा यामुळे ते वेगळेच वाटतात. या यादीत उद्योजक आठव्या स्थानावर आहेत. आजपर्यंत उद्योजक हे बोअरिंग पर्सन्स या यादीत होते मात्र आजकालचे पुरूष मेहनती, बुद्धीमान आणि करियर फोकस्ड असतात व आर्थिक दृष्ट्या सेटल्ड असतात. महिलांना सेल्टल्ड पुरूष नक्कीच भावतात.
actor
या यादीत नंतरच्या नंबरवर आहेत ते कोडर, हॅकर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर्स. माहिती तंत्रज्ञान युगामुळे या प्रोफेशन मधील पुरूषांना स्वतःला शाबीत करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आणि त्यांना पैसाही बक्कळ मिळतो. त्यामुळे ते महिलांच्या आवडत्या प्रोफेशन यादीत आहेत. लेखक जमातीबददलही महिलांना असेच सुप्त आकर्षण असते. लेखक समजूतदार, परिस्थितीची समज असलेले, नवीन विचार करणारे व क्रीएटिव्ह नेचरचे असतात असे म्हणतात. त्यामुळे महिलांना ते आवडतात.

अॅक्टर किवा अभिनेते या जमातीबद्दलही महिलांना वेगळेच आकर्षण असते. येथे अभिनेत्यांना कुणा महिलेच्या मागे जावे लागत नाही तर महिलाच आपण होऊन त्यांची ओळख वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांची अन्य क्वालिफिकेशन अथवा बुद्धीमत्ता ही महिलांसाठी फारशी महत्त्वाची नसते तर सर्वात महत्त्व असते ते कलाकाराभोवती असलेल्या वलयाला.

Leave a Comment