देशातील पहिले कंडोम शोरूम गोव्यात

condom
गोवा: जगभरात गोवा हे राज्य त्याच्या समुद्र किना-यांसाठी लोकप्रिय आहेच पण त्यासोबतच हे शहर मजामस्तीसाठीही लोकप्रिय आहे. पण आता गोवा हे राज्य आणखी एका कारणासाठी ओळखले जाणार आहे. गोव्याची राजधानी असलेल्या पणजीत देशातील पहिले कंडोम शोरूम सुरू करण्यात आले आहे. अशाप्रकारचे देशातील हे पहिलेच शोरूम आहे.

आज सेक्सशी निगडीत बाबींवर बिनधास्तपणे बोलण्यासाठी फार कुणी धजावत नाहीत. सुरक्षित शारिरीक संबंध ठेवण्यासाठी उपयोग केल्या जाणा-या कंडोमचाही त्यात समावेश आहे. एखाद्या मेडिकलमधून कंडोम विकत घ्यायचा झाला तर कित्येकदा विचार केला जातो. त्यातही अनेकांना लाज वाटते. अशात गोवा शहरात थेट कंडोमचे शोरूम सुरू करून एक समाजातील अनेक मान्यतांना तिलांजली देण्यात आली आहे. पण या शोरूममध्ये फक्त कंडोम विकत मिळेल इतकेच नाहीतर सेक्स संबंधी अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली जाणार आहेत.

सुरक्षित सेक्सबाबत देशात जागरूकता पसरवण्यासाठी गोव्यातील पणजी शहरात हे कंडोम शोरूम सुरू करण्यात आले आहे. या कंडोम सेंटरमध्ये जाऊन सेक्स संबंधी छोट्या छोट्या गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शोरूममध्ये महिला बिनधास्त सेक्ससंबंधी कोणतीही माहिती मिळवू शकतात. कोणतेही प्रश्न विचारू शकतात. शोरूम मॅनेजर सांगतात की, या शोरूममध्ये फक्त कंडोम मिळणार नाहीतर प्रॉडक्टसंबंधी सर्व माहितीही मिळेल.

Leave a Comment