अर्थसंकल्पाचे हे परिणाम जाणून घ्या

indian-currency
मुंबई: अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदी १ एप्रिल पासून अमलात येत आहेत. या तरतुदींमुळे आपल्या दैनंदिन जीवनात काय फरक पडणार आहेत; कोणत्या वस्तू स्वस्त होणार तर कोणत्या वस्तू आपल्या खिशाला चाट लावणार; याचा हा एक आढावा…

स्वस्त होणार…
चप्पल, सौर दिवे, सेट टॉप बॉक्‍सेस, ब्रॉडबँड इंटरनेट मोडेम, डिजिटल व्हिडिओ यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, विजेवर चालणारी वाहने, भारतीय बनावटीचे मायक्रोव्हेव ओव्हन, सॅनिटरी नॅपकिन, ब्रेल पेपर, घरे

महाग होणार…
भारतीय बनावटीचे मोबाईल फोन्स, कपडे, विमान प्रवास, शीतपेये, बाटलीबंद पाणी, सिगारेट, विडी वगळता अन्य सर्व तंबाखूजन्य उत्पादने, स्मार्ट घड्याळे, हॉटेलिंग, चित्रपट बघणे, औद्योगिक वापराचे सौर हिटर, आयात दागिने, लॉटरी, मोबाईल सेवा, विमा, दगडी कोळसा, डेबिट कार्ड-क्रेडिट कार्डावरील व्यवहार, सिमेंट, प्रक्रिया केलेले काजू

घर घेणे सुलभ
पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना ५० लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या घरासाठी घेतलेल्या ३५ लाख रुपयांपर्यंत गृहकर्जावरील व्याजावर ५० हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे लहान आणि मध्यम आकाराच्या घरांची मागणी वाढेल. स्वस्त घरांना विकसकांच्या नफ्यावरील करात १०० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच ६५० चौरस फुटांपेक्षा लहान घरांवर सेवाकरात सवलत दिल्याने स्वस्त घरांच्या उभारणीला प्रोत्साहन मिळणार आहे.

व्याज दर घटणार
टपाल खात्याच्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कपात होणार आहे. केंद्र सरकारने पीपीएफवरील व्याजदर ८.७ टक्‍क्‍यावरून ८.१ टक्‍क्‍यांपर्यंत घटविण्यात आला आहे.

Leave a Comment