कर्करोगावर प्रभावी उपचार शोधण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश

cancer
वॉशिंग्टन- कर्करोगाचे नाव काढल्यावर बहुतांशी रुग्णांचा जीव खचतो. जगभरात या असाध्य कर्करोगावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या जीवघेण्या कर्करोगाच्या उपचारासाठी अमेरिकेतील भारतीय शास्त्रज्ञांनी प्रभावी उपचार पद्धती शोधून काढली आहे. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर या पद्धतीत करण्यात येणार असून उपचारांचा प्रतिसाद अवघ्या काही तासांत कळणार आहे. यामुळे भविष्यात कर्करोगावर प्रभावी मात करण्याचे मोठे साधन डॉक्टरांच्या हाताशी येणार आहे.

कर्करोगावरील ही उपचार पद्धती अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) व हॉवर्ड मेडिकल स्कूलमधील भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. याबाबत माहिती देताना एमआयटी व ब्रिघम अ‍ॅण्ड महिला रुग्णालयाचे मुख्य शास्त्रज्ञ शिलादित्य सेन गुप्ता म्हणाले की, पहिल्यांदाच आम्ही कर्करोगावर उपचारासाठी नॅनो टेक्नालॉजी शोधून काढली आहे. या तंत्रज्ञानावर आधारित कर्करोगविरोधी औषध हे नेमके कर्करोगांच्या पेशींवर सोडले जाईल. त्यानंतर कर्करोगाच्या पेशी मरण्यास प्रारंभ होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या रुग्णाला कर्करोगावरील केमोथेरपी दिल्यास त्याचा परिणाम काय होतो हे तत्काळ कळत नाही. रुग्णांना औषधांच्या परिणामासाठी दिवसेंदिवस थांबावे लागते. मात्र, या औषधांचे दुष्परिणाम दिसल्यास नवीन पद्धतीनुसार केमोथेरपीच्या औषधांचा परिणाम काय होतो हे लगेचच कळेल, असे सेन गुप्ता यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment