२०१७मध्ये लॉन्च होईल अॅपलचा कर्व्ह शेप आयफोन

iphone
सॅन फ्रान्सिस्को- अॅपल कंपनी लवकरच आपला नवा फोन बाजारात उतरवणार असून सप्टेंबरमध्ये अॅपल आयफोन ७ तर आयफोन ७एस २०१७मध्ये
लॉन्च करणार असल्याची माहिती मिळाली आहे. आयफोन ७एस हा लेटेस्ट फोन कर्व्ह शेपमध्ये असणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आयफोन ७एस हा लेटेस्ट फीचर्सने अद्ययावत असेल. फोनचा फ्रंट व बॅक, दोन्ही भाग कर्व्ह असतील. आयफोन ६एस प्रमाणे आयफोन ७एसचा डिस्प्ले देखील मोठा असणार आहे. प्लस मॉडेलचा डिस्प्ले ५.८ इंचाचा असणार आहे.

अॅपलच्या नव्या आयफोनची माहिती अॅनालिसिस्ट केजीआय सिक्युरिटीजचे मिंग-ची कुओ यांनी दिली असून कुओ यांनी सांगितले की, ग्लासमुळे आयफोन ७एस हा ६एस पेक्षा वजनाने हलका असेल. कुओ यांनी एक वर्षापूर्वी नुकताच लॉन्च झालेल्या आयफोन एसई बाबत माहिती दिली होती आणि त्यांच्या ही भविष्यवाणी खरी ठरली होती. २०१७ मध्ये बाजारात येणारा आयफोन ७एस असेल, असा दावा कुओ यांनी केला आहे.

नव्या आयफोनमध्ये शानदार बायोमीट्रिक सिक्युरिटी असेल. त्यामुळे अंधारात देखील चेहरा ओळखू शकेल. तसेच फिंगरप्रिंट रीडरच्या तुलनेत ही सिक्युरिटी ब्रेक करणे फारच जटील आहे. इन्फ्रारेड कॅमेर्‍यामुळे अंधारातही यूजरचा फेस रिड करेल. माइक्रोसॉफ्टने ‘सरफेस’ टॅबलेटमध्ये इन्फ्रारेड कॅमेर्‍याचा वापर केला आहे.

Leave a Comment