ओप्पो आणणार ४ जीबी रॅमवाला आर ९!

oppo
मुंबई : भारतात आपला नवीन ‘ओप्पो आर ९’ हा फ्लॅगशिप स्मार्टफोन चीनी स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पो लॉन्च करणार आहेत. सोबतच ‘ओप्पो आर ९ प्लस’ या स्मार्टफोनही लॉन्च होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही फोन ५ एप्रिल रोजी भारतात लॉन्च करण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे. या स्मार्टफोनची डिझाईन आयफोनची कॉपी आहे किंवा नाही? याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. चीनमध्ये सध्या ‘ओप्पो आर ९’ची किंमत जवळपास २८,६१५ रुपये आहे. भारतात याची किंमत काय असेल हेदेखील लवकरच स्पष्ट होईल.

काय आहेत ‘ओप्पो आर ९’चे फिचर्स – यात ५.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि २ गिगाहर्टझ ऑक्टोकोर मिडियाटेक HELIO P १० चिपसेटचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ४ जीबीचे रॅम देण्यात आले आहेत. याची इंटरनल मेमरी क्षमता ६४ जीबी तर मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे.

Leave a Comment