स्मार्टफोन वाटतोय? सावधान, हे आहे पिस्तुल

ghun
आयडील कंन्सील या मिनेसोटाच्या कंपनीने स्मार्टफोनसारखे दिसणारे पिस्तुल तयार केले आहे. गुप्त हत्यारे बनविण्यात ही कंपनी माहीर समजली जाते. गरज भासेल तेव्हा स्मार्टफोनसारखी केस उघडायची आणि पिस्तुल वापरायचे अशी ही कल्पना असून हे पिस्तुल पॉईंट ३८० कॅलिबरचे आहे. या वर्षअखेर हे पिस्तुल बाजारात विक्रीसाठी येणार असून त्याची किंमत आहे ३६५ डॉलर्स म्हणजे २६ हजार रूपये.

कंपनीचे सीईओ कझेलबर्ग या संदर्भात माहिती देताना म्हणाले, अमेरिकेत बंदुकांच्या मागणीत होत असलेली प्रचंड वाढ लक्षात घेऊन हे पिस्तुल बनविले गले आहे. नागरिक हे पिस्तुल रोज सहजपणे स्वतःजवळ बाळगू शकतील. आज सर्वत्र स्मार्टफोन आहेत त्यामुळे हे पिस्तुल लपविणे सहज शक्य आहे कारण बाहेरून ते स्मार्टफोनसारखेच दिसते. त्यामुळे यात पिस्तुल आहे अशी शंकाही कोणाला येणार नाही. आक्टोबरपासून याचे उत्पादन सुरू केले जात आहे.

Leave a Comment