नवी दिल्ली- आज सर्वोच्च न्यायालयात मद्यसम्राट उद्योगपती विजय माल्ल्या यांनी चार हजार कोटींच्या कर्ज फेडीबाबतचे आपले नियोजन सादर केले असून सप्टेंबर २०१६पर्यंत कर्जाची ही रक्कम फेडणार असल्याचेही माल्ल्या यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.
सप्टेंबरपर्यंत ४००० कोटी भरणार माल्ल्या
बँकांसोबत आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्याचे माल्ल्या यांनी सांगितले. बँकांच्या गटाने माल्ल्या यांच्या या प्रस्तावावर एक आठवड्याच्या वेळेत प्रतिसाद द्यावा, असे सांगून सर्वोच्च न्यायलायने या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ एप्रिलला ठेवली आहे.
तथापि, माल्ल्या यांच्या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी वेळ आवश्यक असल्याचे बँकांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. यासंदर्भात बँकांशी बोलणी सुरू असून माध्यमे हा विषय वाढवून सांगत असल्यामुळे हा प्रस्ताव उघड केला जाऊ नये, असे माल्ल्या यांच्या वकिलाने सांगितले.