विवो लॉन्च केला वाय ३१ एल स्मार्टफोन

vivo
मुंबई : आपला नवा स्मार्टफोन विवो कंपनीने भारतात लॉन्च केला असून या स्मार्टफोनचे नाव विवा वाय ३१ एल असे असून काळा आणि पांढऱ्या रंगात हा फोन उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ४जी सपोर्ट असून याची ९ हजार ४५० रुपये किंमत आहे.

विवा वाय ३१ एल स्मार्टफोनचे फीचर्स: यात ७ qHD आयपीएस एलसीडी डिस्प्ले असून १ GHz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन ४१० क्वालकॉम प्रोसेसर यात देण्यात आला आहे. या १जीबी रॅम आणि अँड्रेनो ३०६ जीपीयू ग्राफिक्स कार्ड देण्यात आले आहे. यात १६ जीबी इंटरनल स्टोरेज तर मायक्रो एसडीच्या मदतीने १२८जीबी पर्यंत वाढवण्याची सुविधा देण्यात आली असून याचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सलचा तर फ्रंट फेसिंग कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा आहे. यात ४जी एलटीई रेडिओज वाय-फाय, ब्लूटूथ ४.०, जीपीएस, एफएम रेडिओ, चार्जिंग आणि डेटा ट्रान्स्फरसाठी मायक्रो यूएसबी अशा कनेक्टीव्हिटी देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment