भारतात १०१.७९ कोटी मोबाईल यूजर्स

mobile-users
नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार भारतातील मोबाईल यूजर्सचा आकडा १०१.७९ कोटींवर पोहोचला आहे. ही आकडेवारी ३१ जानेवारी २०१६ पर्यंतची आहे तर लँडलाईन वापरणा-यांची संख्या २.५३ कोटी आहे. एकूण दूरसंचार वापरकर्त्यांची आकडेवारी १०४ कोटींवर पोहोचली आहे.

७० लाख लोकांनी जानेवारी महिन्यात दूरसंचार वापरास सुरुवात केली. एअरटेलने सर्वांत जास्त २५ लाख ग्राहक जोडले आहेत तर आयडियाने १२.५१ लाख आणि वोडाफोनने ११.१२ लाख ग्राहक जोडले आहेत. बीएसएनएल चौथ्या क्रमांकावर असून ९.२५ लाख ग्राहक जोडले गेले. टेलिनॉरने ७.२४ लाख, एअरसेलने ४.३५ लाख आणि रिलायन्स कम्युनिकेशनने ३.१५ लाख नवे ग्राहक जोडले आहेत.

भारतात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या ४.४ टक्क्यांनी वाढत आहे तसेच २०२० पर्यंत भारतात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जगभरात मोबाईल वापरात भारतीय यूजर्सचे योगदान ७१ टक्के असणार आहे. गतवर्षी मोबाईल वापरकर्त्यांची संख्या ७९.८४ कोटी इतकी होती. स्मार्टफोनच्या विक्रीशी आर्थिक दर वाढीशी थेट संबंध आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे अनेक अशासकीय कामे होतात ज्यात इंटरनेट कॉमर्समध्ये वाढ होत आहे. ई-गव्हर्नेसचा विस्तार होणे आदीचा समावेश आहे.

गार्टनरचे रिसर्च संचालक अमरेश नंदन यांचे म्हणणे आहे की, येत्या काही वर्षांत मोबाईल वापरकत्र्यांची संख्या अब्जाहून किती तरी आधिक होईल. मोबाईल यूजर्सची संख्या वाढत असल्याने डाटा उपयोगातही वाढ होईल तसेच मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचा उपयोग सर्वात जास्त होईल. या इंटरनेटच्या मदतीने लाखो व्यवसायिक आपला उद्योग करतील. सोशल नेटवर्कवर राहतील आणि गव्हर्नेसमध्येदेखील आपल्या मोबाईलच्या माध्यमातून भागिदारी करतील.

जगात भारत आणि चीन केवळ असे देश आहेत ज्यांच्याकडे अब्जाहून अधिक मोबाईल यूजर्स आहेत. चीनने २०१२ मध्येच एक अब्ज मोबाईल यूजर्सचा आकडा पार केला होता. भारतात हा आकडा मागील काही वर्षांपासून वाढत आहे. जर आणखी माफक दरात मोबाईल उपलब्ध झाले आणि कॉल दरही स्वस्त झाले तर मोबाईल वापरकत्र्यांच्या संख्येत आणखी गतीने वाढ होऊ शकेल.

Leave a Comment