फक्त रेस ट्रॅकसाठी बनलीय ऑस्टनची व्हल्कन कार

vulcan
लक्झरी कार निर्माते अॅस्टन मार्टिन यांनी त्याची व्हल्कन ही लिमिटेड एडिशन कार सादर केली असून या कारची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही कार घेणार्‍यांना ती कस्टमाईज करून घेता येणार आहे.फक्त रेसिंग ट्रॅकसाठी बनविलेल्या या कारची किंमत आहे २३ लाख डॉलर्स म्हणजे १५ कोटी रूपये.

व्हल्कन ही रोमन पुराणातली अग्नीदेवता. याच नावावरून बनविलेल्या या कारचे फिचर्सही अग्नीप्रमाणेच तेज आहेत. या कारची फक्त २४ युनिट तयार केली जाणार आहेत, कारची संपूर्ण चासी हाय क्वालिटी कार्बन फायबरपासून बनविली गेल्याने ही कार मजबूत तरीही वजनाला हलकी झाली आहे. या कारला ७.० लीटर व्ही १२ पेट्रोल इंजिन दिले गेले असून ते कंपनीच्या रेसिंग विभागानेच तयार कले आहे. ब्रॅम्बो कार्बन सिरॅमिक रेसिंग डिस्क ब्रेक्स शिवाय एबीएस सिस्टीमही दिली गेली आहे. ६ स्पीड ट्रान्सअॅक्सल सिक्वेंशन गिअर बॉकस, रियर भागात युनिक लाईट ब्लेड दिले गेले आहे. १ ते १०० किमीचा वेग ती २.९ सेकंदात घेते व तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३६० किमी.

Leave a Comment