तब्बल ३९ हजार रुपयांचा लिंबू

lemon
तामिळनाडू – उन्हाची तीव्रता वाढली की लिंबाचा दरही वाढतो. थंडगार पाणी पिण्याबरोबर लिंबू सरबतला जास्त पसंती दिली जाते. सध्या लिंबाचे दर वाढताना दिसतात. मात्र, या लिंबाची खरेदी पाहून तुमचा विश्वास बसणार नाही. चक्क एका लिंबाला ३९,००० रुपयांना एका दाम्पत्याने खरेदी केले आहे.

११ दिवसांचा उत्सव तामिळनाडू राज्यातील वेलुपुरम जिल्ह्यामधील बालातंडेउतपनी मंदिरात असतो. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मुरुगन या देवाच्या भाल्याला लटकविण्यात आलेल्या लिंबाचा लिलाव करण्याची परंपरा आहे. मंदिर संस्थान याचा लिलाव आयोजित करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंदीर प्रशासनाने पवित्र लिंबाचा लिलाव केला. ग्रामस्थांचा विश्वास आहे की, लिलाव करण्यात आलेली वस्तु ज्यांच्याकडे जाते त्यांना सुख, समृद्धी प्राप्त होते आणि खरेदी करणा-या त्या कुटुंबाची भरभराट होते. यावर्षी लिलाव करण्यात आलेला हा लिंबू तब्बल ३९,००० रुपयांना विकला गेला आहे. हा पवित्र लिंबू खरेदी करण्यासाठी नागरिक बोली लावण्यास सुरुवात करतात. यावर्षी जयरामन व अमरावथी या दांपत्यानं ३९ हजार रुपयांची बोली लावत पवित्र लिंबू मिळवला.

Leave a Comment