इंटेक्सचा नवा ४ जी स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध

intex
नवी दिल्ली : आपला नवा स्वस्त ४ जी स्मार्टफोन इंटेक्स क्लाउड ज्वेल बाजारात इंटेक्सने लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त ५,९९९ रूपये आहे. सोमवारपासून या फोनची विक्री स्नॅपडील या ई-कॉमर्स वेबसाईटवर सुरू करण्यात आली आहे. इंटेक्सने या फोनबाबत म्हटले, जे ग्राहक पहिल्यांदाच ४ जी स्मार्टफोन वापरणार आहेत, त्यांच्यासाठी हा नवीन इंटेक्स क्लाउड ज्वेल स्मार्टफोन एक उत्तम पर्याय आहे.

फीचर्स : याचा डिस्प्ले ५ इंचाचा असून यात अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटींग सिस्टीम देण्यात आले आहे. त्याचबरोबर १ गीगाहर्टझ क्वाडकोअर मीडियाटेक प्रोसेसर आणि २ जीबी रॅम देण्यात आले आहेत. यात ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याची इंटरनल मेमरी क्षमता १६ जीबीची आहे. यात ३ जी, वाय-फाय, ब्लुटूथ ४.०, ३.५ एमएम ऑडीओ जॅक, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि अँबियंट लाईट सेन्सर सारख्या कनेक्टीव्हिटी देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment