‘डीआरडीओ’ विकसित करणार ‘स्टार वॉर्स’सारखी शस्त्र

directed-energy-weapons
नवी दिल्ली: संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) लष्करासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्र विकसित करण्याच्या प्रयत्नात असून ही शस्त्र हॉलिवूड चित्रपट ‘स्टार वॉर्स’मध्ये दाखविल्याप्रमाणे विलक्षण प्रभावी असणार आहेत. ही शस्त्र ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन्स’ (डीईडब्ल्यू) म्हणून ओळखले जाते.

अमेरिका, रशिया या देशांच्या बरोबरीने चीन आणि भारत अशा शस्त्रास्त्रांच्या विकसनाच्या प्रयत्नात आहे. या मधील सर्वात मोठे आव्हान लढाऊ विमाने आणि युद्धनौकांसाठी सॉलिड-स्टेट लेजर डायरेक्टेड एनर्जी वेपन्स विकसित करणे हे आहे.

अशी शस्त्रास्त्र बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्नांना सुरुवात झाली असली तरीही त्याचे तंत्रज्ञान पूर्ण विकसित होऊन प्रत्यक्ष शस्त्रास्त्र बनविणे आणि ती उपयोगात आणणे याला विलंब होण्याची शक्यता आहे. सध्या डीआरडीओमध्ये अनमॅन्ड एरियल व्हेइकल (यूएव्ही) हे लक्ष्यभेद करणारे मानव रहित साधन बनविण्यावर काम सुरू आहे.

Leave a Comment