गुरूवारी येणार शाओमी एमआय फाईव्ह

xaomi-mi5
चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी त्यांचा फ्लॅगशीप स्मार्टफोन शाओमी एमआय फाईव्ह गुरूवारी भारतात लाँच करत आहे. या महिन्याच्या सुरवातीसच कंपनीने रेडमी नोट ३ लाँच करताना एमआय फाईव्हच्या लॉचिंगची घोषणा केली होती. हा फोन २४ फेब्रुवारीला बिजिंग येथील इव्हेंटमध्ये सादर केला गेला होता तो चीनबाहेर प्रथम भारतातच लाँच केला जात आहे. चीनमध्ये हा फोन ३ व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे.

ड्युअल सिम, दोन्ही नॅनो सिम, ५.१५ इंची फुल एचडी डिस्प्ले, कर्व्ह थ्रीडी सिरॅमिक ग्लास, स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसरसह अड्रीनो ५३० जीपीयू, १६ एमपीचा सोनी आयएमक्स २९८ कॅमेरा सेंसर एलईडी फ्लॅशसह या फोनसाठी दिला गेला आहे. या कॅमेर्‍यावर ४ के व्हिडीओही बनविता येणार आहेत. फ्रंट कॅमेरा ४ एमपीचा आहे व हा फोन क्विक चार्ज ३.० टेक्नॉलॉजीसह आहे. वायफाय, ब्ल्यू टूथ एनएफसी, यूएसबी कनेक्टिव्हीटी ऑप्शन्स व फिंगरप्रिंट स्कॅनर अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

या फोनच्या स्टँडर्ड व्हेरिएंटसाठी ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, हाय व्हर्जनसाठी ३ जीबी रॅम व ६४ जीबी इंटरनल मेमरी व एक्सक्लुझिव्ह व्हर्जनासाठी ४ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल मेमरी दिली गेली आहे. त्यांच्या किमती चीन बाजारात अनुक्रमे २१ हजार, २४ हजार व ३१५०० रूपये आहेत.

Leave a Comment