आता सर्व आपत्कालीन सेवांसाठी ११२ डायल करा

trai
नवी दिल्ली : आतापर्यंत देशभर पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका या आपत्कालीन सेवांसाठी १००, १०१ आणि १०२ या क्रमांकांवर संपर्क साधावा लागत असे. पण आता या तिन्ही सेवा ११२ या एकाच क्रमांकावर उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारने ठरवले असून टेलिकॉम अॅथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने तिन्ही सेवांसाठी एकच क्रमांक असावा, अशी केलेली शिफारस केंद्रीय मंत्री गटाने मान्य केली. एका महिन्यात ही सेवा देशभरात अमलात येईल, अशी माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत दिली. या सर्व सेवा अमेरिकेत ९११ या एकाच क्रमांकावर उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे आता या सेवा भारतातदेखील शक्य होईल.

Leave a Comment