३३०० कोटींची गुंतवणूक करणार उबेर

uber
नवी दिल्ली – देशात चालू वर्षामध्ये जूनपर्यंत ५० कोटी डॉलर्स म्हणजे जवळपास ३३०० कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची तयारी टॅक्सी प्रवासाची सोय देणा-या उबेरने सुरू केली आहे. कंपनी प्रत्येक महिन्याला सरासरी १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना तयार करत आहे.

आपले जगातील तिस-या क्रमांकाचे मार्केट असलेल्या भारतामध्ये ‘ओला’ला टक्कर देण्यासाठी उबेरने हे पाऊल उचलेले आहे. मागील नऊ महिन्यामध्ये जगातील सर्वात महत्त्वपूर्ण स्टार्टअपने भारतामध्ये १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यास संमती दिली होती. भारतीय बाजार उबेरसाठी अमेरिका अथवा चीनपेक्षा मोठा होण्याची शक्यता असल्यानेच येथे मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येत आहे. आम्ही भारतामध्ये आमची व्याप्ती वाढवत असून, कंपनीने 1 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा शब्द अजून पाळलेला नाही. आम्ही प्रत्येक डॉलर प्रतिस्पर्ध्यापेक्षा उत्तम सेवा देण्यासाठी खर्च करणार आहोत. त्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात येत आहेत.

Leave a Comment