नवी दिल्ली – व्हॉट्स अॅप वापरणाऱ्या देशातलल्या तमाम जनतेसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आता यापुढे आपल्या व्हॉट्स अॅपवरुन तुम्ही मोबाईल आणि लँडलाईनवरही फोन करु शकणार आहात.
व्हॉट्सअॅपवरून करा मोबाईल-लँडलाइन कॉल !
सरकारच्या इंटर-मिनिस्ट्रीअल पॅनलतर्फे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि टेलिकॉम ऑपरेटर्सदरम्यानच्या इंटर-कनेक्ट कराराला हिरवा कंदील दाखवण्यात आल्यामुळे आता व्हॉट्सअॅप, स्काईप, व्हायबरवरूनही कॉल करण्याची ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. मोबाईल वा लँडलाइन नंबरवर या अॅप्सवरून कॉल करण्याचे हे फीचर उपलब्ध झाल्यास व्हॉईस कॉलचे चार्जेस कमी होण्याची शक्यता आहे.