अबब! १ कोटी रूपयांचा कुत्रा

rocky-handsome
बंगळूरू: सतीश एस यांच्या घरी एका श्वानराजाचे चीनमधून आगमन झाले असून या कुत्र्याची किंमत तब्बल १ कोटी रूपये असल्याचे समजते. कोरियन डोसा मस्टीफ जातीचा हा कुत्रा त्याच्या हुंगण्याच्या जबरदस्त ताकदीमुळे ‘सर्च डॉग’ म्हणून जगभर ओळखला जातो. महागड्या ऑडी अथवा बीएमडब्ल्यू कारपेक्षा या कुत्र्यांची किंमत अधिक आहे.

सतीश एस हे इंडियन डॉग ब्रिडर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत व स्वतः डॉग ब्रिडरही आहेत. त्यांनी चीनमधून या जातीची २ महिने वयाची दोन पिले मागविली होती. या जातीच्या कुत्र्याचे मालक बनणारे सतीश हे भारतातले पहिले ब्रिडर ठरले आहेत. या कुत्र्याचे आयुर्मान ७ ते १२ वर्षांचे असते. कोणत्याही वातावरणात ही कुत्री सहज राहू शकतात तसेच अतिशय प्रामाणिक आणि शांत असतात. कच्चे मांस हे त्यांचे आवडते अन्न आहे. सतीश यांच्याकडे विविध जातीची १५० कुत्री आहेत. मस्टीफ कुत्र्यांना सर्च डॉग म्हणून प्रशिक्षित करता येते.

Leave a Comment