सूर्यप्रकाशाने आपोआप स्वच्छ होणार कपडे

clothes
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठीतील संशोधकांनी उन्हात अथवा बल्बसमोर मळलेले कपडे धरले असता ते आपोआप स्वच्छ होतील असे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. संशोधकांच्या या टीममध्ये भारतीय वंशाचे राजेश रामनाथन यांचाही समावेश आहे. या संशोधकांनी कपडे स्वच्छ करण्यासाठी नॅनो स्ट्रक्चर तयार करण्याची विशिष्ठ पद्धत विकसित केली आहे.

रामनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार चांदी व तांब्याचा वापर करून नॅनो स्ट्रक्चर तयार केले गेले आहे. हे धातू अधिक प्रकाश शोषणारे आहेत. मळलेल्या कपड्यावर सूर्यप्रकाश अथवा बल्बचा प्रकाश टाकला की कपड्यातील ऑरगेनिक पदार्थ आपोआप डीग्रेड होतात. कपड्यात थ्रीडी स्ट्रक्चर असते व त्यातच हा प्रकाश शोषला जातो.

नॅनो स्ट्रक्चर या प्रकाशाच्या संपर्कात आले की त्यांना उर्जा मिळते व त्यातून हॉट इलेक्ट्राॅन तयार होतात व त्यामुळे कपड्यातील जैविक घटकांचे डिग्रेडिंग सुरू होऊन कपडे स्वच्छ होतात. हे संशोधन अॅडव्हान्स मटेरियल इंटरफेसेज जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Comment