एका कॉलद्वारे रेल्वे तिकीट होणार कन्फर्म आणि रद्द

railway
नवी दिल्ली : एप्रिल महिन्यापासून केवळ एक फोनकॉल करून रेल्वेतिकीट रद्द आणि कन्फर्म करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना तिकीट रद्द करण्यासाठी १३९ डायल करून आपल्या कन्फर्म तिकिटाची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. त्यानंतर प्रवाशाला एक पासवर्ड मिळेल. हा पासवर्ड घेऊन त्याच दिवशी रेल्वेकाऊंटरवर प्रवाशाला जावे लागेल. त्यानंतर तेथे आपला पासवर्ड सांगितल्यानंतर त्याला तिकिटाचे शुल्क परत मिळेल.

शुल्क परत करण्याच्या नियमांमध्ये बदल केल्यानंतर अनेक प्रवाशांना आरक्षित तिकीट निर्धारित वेळेत रद्द करण्यात अडचणी येत होत्या व त्यामुळे अनेकांना त्यांचे पैसेही परत मिळण्यात समस्या येत होती. गरजू प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळावे, म्हणून रेल्वे तिकीट रद्द करण्याची रक्कम दुप्पट करण्यात आली होती.

नव्या नियमांनुसार, गरजू प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळावे यासाठी तिकीट रद्द केल्यास दुप्पट रक्कम आकारली जात होती. आधिका-याने सांगितले की, दलाल आणि तिकिटांचा काळा बाजार करणा-यांना आळा बसावा म्हणून हा नवा नियम आणण्यात आला होता. परंतु, त्यामुळे गरजू प्रवाशांनाही त्रास सोसावा लागला. त्यामुळे आता १३९ सुविधा उपलब्ध करून देत तिकीट रद्द करण्याची नवी योजना आणण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

Leave a Comment