आशियाई देशांच्या चलनात रूपया मजबूत

Indian-Rupee
जागतिक अर्थव्यवस्थेची गती चालू आर्थिक वर्षात अनिश्चित असतानाच भारतीय रूपयाची स्थिती अन्य आशियाई देशांच्या चलनाच्या तुलनेत मजबूत असल्याचे ब्लुमबर्गच्या अहवालात नमूद केले गेले आहे.

फॉरेन एक्स्चेंज मार्केटमध्ये भारताच्या रिझर्व्ह बँक व वित्त मंत्रालय व्यवस्थापनाची त्यामुळे चांगली प्रतिमा तयार झाली आहे आणि याचे सारे श्रेय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडे जात असल्याचेही या अहवालात नमूद केले गेले आहे. रघुराम राजन यांनी उचललेल्या पावलांमुळे रूपया या स्पर्धत टिकून राहिला असल्याचा उल्लेख या अहवालात केला गेला आहे.

या यादीत भारतीय रूपयाने चीनच्या युआनला मागे टाकले आहे. आशियाई देशांच्या यादीत इंडोनेशियाचा रूपया टॉपवर असून त्यानंतर विकसित जपानचा येन दोन नंबरवर आहे. सिंगापूरचा डाँलर तीन नंबरवर तर भारताचा रूपया चार नंबरवर आहे.

Leave a Comment