दफनठिकाणाहून गायब झाली शेक्सपियरची कवटी

sheakspear
पुरातत्व खात्याने प्रसिद्ध नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपियरची कवटी चोरीला गेल्याची माहिती माहिती दिली आहे. विल्यम शेक्सपियर यांचा मृतदेह होली ट्रिनिटी चर्चमध्ये दफन करण्यात आला होता.

रडारने शेक्सपियरच्या दफनविधी ठिकाणाचे स्कॅनिंग केले असता त्याची कवटी गायब असल्याचे दिसून आले, ती बहुदा अठराव्या शतकात चोरीस गेली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञ केविन कोल्स यांनी शेक्सपियरच्या दफनस्थळाच्या तपासणीची माहिती जाहीर केली आहे. आमच्या उपकरणांच्या मदतीने दफनठिकाणातील बदल लगेच ओळखले जातात, असे कोल्स यांचे म्हणणे आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी २३ एप्रिल १६१६ रोजी शेक्सपिअर यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहाला दफन करण्यात आले होते. विल्यम शेक्सपियरच्या मृतदेहासंबंधी याअगोदरही अनेक बातम्या समोर आल्या होत्या.