मुंबई – आजपासून आयडीबीआय बँकेचे कर्मचारी संपावर गेले आहेत. आयडीबीआय बँकेच्या कर्मचा-यांचा हा संप ४ दिवस चालणार आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने ही माहिती दिली आहे.
आयडीबीआय बँकेचे कर्मचारी संपावर
आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाचा डाव केंद्र सरकारने मांडला असल्यामुळे आम्ही संपाचे हत्यार उपसले आहे, अशी प्रतिक्रिया कर्मचारी संघटनेने दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आयडीबीआय बँकेमधली हिस्सेदारी ४९ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे खासगी गुंतवणूकदार बँक विकत घेतील आणि कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा येईल, अशी भीती संघटनांनी व्यक्त केली आहे. आयडीबीआय बँकेचे ३२ हजार कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार आहेत.