आता पाईपलाईनमधून मिळणार बियर!

beer
आपण आजवर पाणी, गॅस, अशा गोष्टी पाईपलाईनमार्गे पोहोचवले असे ऐकले आणि पाहिले देखील असेल. पण आता पाईपलाईनद्वारे बिअर मिळणार असल्याचे तुम्ही ऐकले आहे का ? पण याच उत्तर नक्कीच नाही, पण हे शक्य झाले आहे बेल्जियममध्ये. येथील तळीरामांना चक्क पाईपलाईनमधून बिअर मिळणार आहे.

बेल्जियममध्ये हा निर्णय पर्यावरणाच्या संवर्धनासाठी घेण्यात आला आहे. त्यासाठी बियर उत्पादक कंपनीने चक्क दोन मैल पाईपलान टाकण्याची तयारी सुरू केली आहे. देशाची नैसर्गिक संपत्ती आणि कायद्याचे जतन करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे कंपनी सांगते.

या कंपनीचे ‘डि हाल्वे मान’ असे नाव असून, ती ब्रुएरी ब्रुजेस येथे बियरचे उत्पादन करते. विशेष म्हणजे बियर बणवणारी ती येथील एकमेव कंपनी आहे. ब्रुजसला सुंदर आणि साफ राखण्याचे मोठे आव्हान तेथील नागरींकांसमोर आहे. त्याचाच एक भाग म्हणून डि हाल्वे मान बॉटलिंग प्लांट पर्यंत जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी करू इच्छिते. त्याचसाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने याशिवाय दुसऱ्या एका बोटलिंग प्लांटपर्यंत जाण्यासाठीही २ मैल लांबीची पाईपलाईन बणविण्याचे काम सुरू केले असून, या पाईपलाईनमधून १५०० गॅलन इतक्या बियरचे वाहन केले जाणार आहे.

Leave a Comment