मुंबई : स्मार्टफोनप्रेमींसाठी अमेझॉनने खास सेल सुरु केला असून हा ‘मेगा मोबाईल सेल’ २८ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सुरु असेल. या सेलमध्ये एक हजार रुपये ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत डिस्काऊंट देण्यात आला आहे. कार्डद्वारे पेमेंट केल्यास १० टक्के अधिक सुट मिळणार आहे.
गूगल नेक्सस ६पी चे ६४ जीबी व्हेरिएंटच्या हँडसेटवर या सेलमध्ये ३ हजार ५०० रुपये सवलत असून आता हा हँडसेट ३९ हजार ४९९ रुपयांना मिळणार आहे, तर ३२ जीबीचे व्हेरिएंट सवलतीनंतर आता ३४ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे.
अमेझॉनवर मोबाईलप्रेमींसाठी खास ‘मेगा मोबाईल सेल’
१ हजार ९९० रुपयांचे डिस्काऊंट ऑनर 4X या स्मार्टफोनवर जाहीर केल्याने आता हा स्मार्टफोन ९ हजार ४९९ रुपयांना मिळणार आहे. जानेवारी महिन्यात ५५ हजार ९९० रुपयांना लॉन्च झालेला सोनी एक्सपीरिया Z3+ स्मार्टफोन सवलतीनंतर २३ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे.
त्याचप्रमाणे लेनोव्हो वाईब S1 वर एक हजार रुपयांची सवलत जाहीर करण्यात आल्यामुळे हा स्मार्टफोन आता १४ हजार ९९९ रुपयांना मिळेल. वनप्लस एक्स Onyx स्मार्टफोनच्या १६ जीबीच्या व्हेरीएंटवर २ हजार रुपये डिस्काऊंट असून हा स्मार्टफोन आता १४ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे. शिवाय, मोटो जी टर्बो एडिशनच्या १६ जीबी मॉडेलवर एक हजाराची सवलत असून हा स्मार्टफोन आता ११ हजार ४९९ रुपयांना मिळणार आहे.
मोटोरोला मोटो जी (जेन ३) १६ जीबी मॉडेल अमेझॉनच्या या मेगा मोबाईल सेलमध्ये एक हजार रुपयाच्या सवलतीनंतर ९ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे. कूलपॅड नोट ३ ची किंमत एक हजार रुपयांच्या डिस्काऊंटनंतर ८ हजार ४९९ रुपयांना मिळेल.