यंत्रमानवांच्या हाती युद्धाचे नियंत्रण ?

samsung
पॅरिस : आगामी काळात रायफली, क्षेपणास्त्रे व बॉम्ब यांचे नियंत्रणही यंत्रमानव म्हणजे रोबोटच्या हातात जाऊ शकते, पण सध्या चालकरहित मोटारींचे जे होते आहे तोच प्रकार यात होऊ शकतो, गुगलच्या चालकरहित मोटारींना आतापर्यंत अनेकदा अपघात झाले आहेत. टेस्लाचे प्रमुख एलन मस्क, भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग व एमआयटीचे प्राध्यापक नोम चोम्सकी यांनी आधीच याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. जुलैतील आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेत हजारो संशोधक उपस्थित होते, त्यांनी एक खुले पत्र तयार केले होते त्यानुसार लष्करात कृत्रिम बुद्धिमत्तेला वाव देणे व शस्त्रांचे नियंत्रण करणे धोकादायक ठरू शकते.

स्वयंचलित म्हणजे यंत्रमानवाकडून चालवली जाणारी शस्त्रे अयोग्य आहेत. ‘टर्मिनेटर’ चित्रपटाप्रमाणे यात यंत्रमानव काम करतील अशी शक्यता असताना त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यात कृत्रिम बुद्धिमतेचा वापर केला जाऊ शकतो. संरक्षण उद्योगात यंत्रमानवांच्या रूपात यंत्रमानव काम करू शकतात. एरियल हे अमेरिकी स्टार्ट अप आय-रोबोटचे पहिले उत्पादन. त्याच्या मदतीने सुरूंग शोधता येतात. १९९६ मध्ये व्हॅक्यूम क्लीनर तयार करणा-या कंपनीने हे यंत्र शोधले. यात माणसांना धोका निर्माण होऊ नये हा हेतू आहे.प्राणघातक शस्त्रे मानवी निरीक्षणाशिवाय यंत्रमानवांच्या हातात गेली, तर ती आणखी घातक ठरतील, नोव्हेंबर २०१२ मध्ये ‘ह्यूमन राइट्स वॉच’ या संस्थेने असे म्हटले होते, की स्वयंचलित व यंत्रमानवावर आधारित शस्त्रांचा विकास करणे थांबवावे, आज नाही तरी २०-३० वर्षांत ही शक्यता आहे.

सॅमसंगने ‘सेंट्री’ नावाचा एसजीआर ए १ हा यंत्रमानव तयार केला आहे. फ्रान्सचे राजदूत जीन ह्यूजेल सिमॉन मिशेल यांच्या विनंतीनुसार मे २०१४ मध्ये याबाबत परिषद बोलावली होती. देशांनुसार घातक शस्त्रांची व्याख्या बदलत असते. यंत्रमानवाकडून चालवली जाणारी अस्त्रे ही आकार बदलणारी असतात, असे अमेरिकी संशोधक व इंटरनॅशनल कमिटी ऑन रोबोट आर्मस कंटड्ढोलचे सहसंस्थापक पीट असारो यांनी सांगितले. कालांतराने सैनिकांची जागा यंत्रमानव घेतील, त्यामुळे युद्ध गुन्हे घडले तरी कुणालाच न्यायालयापुढे उभे करता येणार नाही, बळाच्या वापरात मानवी निर्णय क्षमतेचा भाग असतो, तो तेथे फारसा असेलच असे नाही. यंत्रमानव काही घाबरत नाहीत, त्यामुळे ते भावनेच्या आहारी जाऊन रागाच्या भरात प्रतिक्रिया देणार नाहीत, असे मत हेरिटेज फाऊंडेशनचे स्टीव्ह ग्रोव्हज यांनी व्यक्त केले आहे. पीटर असारो म्हणतात, की स्वयंचलित यंत्र माणसापेक्षा जास्त कार्यक्षम असतात, पण मानवी सैनिक हा गोळीबाराच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतो व पार्श्वभूमीचा त्याला विसर पडत नाही, यांत्रिक सैनिकाचे मात्र तसे नसते. यंत्रमानवांचा वापर युद्धात करण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारावर सहमती घडवण्याचा प्रयत्न आतापासून सुरू आहे.

Leave a Comment