सौदीवर बेरोजगारीचे सावट

saudi
नवी दिल्ली – सध्या तेलाच्या मागणीमध्ये घसरण झाल्याने सौदी अरबमध्ये मोठे आर्थिक संकट उभे राहिले असल्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणावर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगाराची संधी सौदी नागरिकांना मिळवून देण्यासाठी सौदी सरकार प्रयत्न करत असून, त्यांनी त्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत.

सौदी अरबमध्ये मागील दशकात जोरदार आर्थिक वाढीमुळे दक्षिण आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि अन्य देशांतून मोठय़ा प्रमाणावर लोक येथे नोकरीसाठी आले आहेत. खासकरून तेल क्षेत्रात कमी उत्पन्न मिळणारी पदे, बांधकाम आणि सेवा क्षेत्रात बाहेरून आलेल्या लोकांचा मोठय़ा प्रमाणावर भरणा आहे. सौदीच्या सरकारी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या ३ कोटी ८० लोकसंख्येपैकी जवळपास १ कोटी लोक हे विदेशातील असून, त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न सरकारसमोर आहे.

Leave a Comment