सॅमसंग होणार जगातील सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी

samsung
नवी दिल्ली – कॉर्पोरेट कल्चरमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन आणि मेमरी कार्ड निर्माता कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिकने घेतला आहे. स्टार्टअपसाठी काम करण्याचे कंपनीने जाहीर केले असून जगातील सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी होण्याचे कंपनीचे स्वप्न आहे. यावर सॅमसंगचे मुख्य अधिकारी चर्चा करणार असून यामध्ये टॉप-डाउन कल्चर लागू करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

कंपनीच्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये सुधारणा करताना बिझनेस हेड आणि सामान्य कर्मचारी यांच्यामध्ये थेट चर्चा करण्यासाठी वातावरण निर्मिती तयार करण्यात येणार असून ही चर्चा ऑनलाईन करण्यात येणार आहे. कंपनीमध्ये अंतर्गत वातावरणामध्ये बदल करण्यात येणार असून, एका स्टार्टअप कंपनीप्रमाणे धोरणे लागू करण्यात येणार आहे. कंपनीमध्ये मोकळे आणि सतत प्रगतीकडे जाणारे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment