खादीला वाढती मागणी; विक्री २,००० कोटींवर

khadi
मुंबई – खादीची विक्री मोठय़ा प्रमाणावर व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्यामुळेच खादी उत्पादनांची विक्री ११०० कोटी रुपयांवरून चालू वर्षात २००० कोटींवर गेली आहे. खादीला त्यामुळे येत्या काळात अच्छे दिन येण्याची शक्यता असून खासगी व सरकारी कंपन्या, रेल्वे, सरकारी विभाग आणि खासगी कंपन्या यांच्याकडून खादी ऍन्ड व्हिलेज इंडस्ट्री आयोगाला मोठय़ा प्रमाणात खादीची मागणी करण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठी खासगी स्वयंसेवी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) तर एक हजार कोटी रुपयांची ऑर्डर देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक राज्यांनी यापूर्वीच आपली खादी उत्पादने विकण्यासाठी फ्लिपकार्ट, स्नॅपडील यासांरख्या ई-कॉमर्स कंपन्यांशी हात मिळविल्यामुळे खादीच्या उत्पादनामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे.

देशातील विणकरांना खादी उत्पादनामध्ये वाढ झाल्याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. विणकरांचे प्रतिदिन उत्पन्न १०० रु. ते १५०रुपयांपर्यंत असते. मात्र आता ऑर्डर्स मोठय़ा प्रमाणावर मिळत असल्याने त्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याची शक्यता आहे. याच्यासह देशाच्या ग्रामीण भागात अनेक विणकर जोडले गेले आहेत. त्यांना दिवसातून फक्त तीन ते चार तास काम मिळत होते. मात्र आता ऑर्डर्समध्ये वाढ झाल्यामुळे त्यांना पाच ते सहा तास काम मिळणे शक्य होणार आहे.

Leave a Comment