फेसबुकच्या ‘फेक’ खात्यांना बसणार चाप

facebook
नवी दिल्ली : सध्या संपर्काचे नवीन माध्यम म्हणून सोशल मीडिया विकसित झाले आहे. मात्र, मोठय़ाप्रमाणात फेसबुकसारख्या सोशल मीडियावर इतरांचे फोटो व नावाचा वापर करून डुप्लिकेट अकाऊंट उघडले जात असून सर्वात जास्त यामध्ये महिलाच टार्गेट होत आहेत.

फेसबुक लवकरच या सर्वांवर आळा घालण्यासाठी एक नवीन फिचर घेवून येत असून जर कोणी व्यक्ती तुमच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करून फेक अकाऊंट काढण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याचे लगेच तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळणार आहे. त्यावरून तुमच्या नावाचा अथवा फोटोचा गैरवापर करणा-या व्यक्तीला पकडणे शक्य असल्याची माहिती फेसबुकचे ग्लोबल सेफ्टी प्रमुख एंटिगोन डेविस यांनी दिली आहे.

डेविस म्हणाले, तुम्हाला नोटिफिकेशन मिळाल्यानंतर १० प्रश्न विचारले जातील, ज्यावरून आपल्या खात्यासोबत कोण छेडछाड करत आहे याची माहिती मिळेल. हे संपूर्ण प्रोसेस ऑटोमॅटीक असणार आहे. याचे प्रात्यक्षिके काही देशांमध्ये घेण्यात आले असून, याचे नक्कीच चांगला फायदा होणार आहे. लवकरच हे फिचर फेसबुक युजर्ससाठी येणार आहे.

खास महिलांच्या सेफ्टीसाठी हा फिचर आणण्यात येणार आहे. जेणेकरून कोणत्याही महिलांच्या फोटोचे व नावाचे दुरूपयोग होणार नाही. आणि महिलांनाही सुरक्षितात मिळेल.