‘सनोफी इंडिया’चे अध्यक्षपद सोडणार माल्ल्या

vijay-mallya
मुंबई – औषध निर्माण क्षेत्रातील कंपनी ‘सनोफी इंडिया लिमिटेड’चे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय दिवाळखोर उद्योगपती विजय माल्ल्या यांनी घेतला आहे. कंपनीकडून प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, आगामी वर्षात कंपनीच्या सर्वसाधारण बैठकीत माल्ल्या यांनी संचालक पदाच्या दावा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

१९७३ मध्ये माल्ल्या पहिल्यांदा कंपनीमध्ये संचालकपदी नियुक्त झाले होते. डिसेंबर १९८३ पासून माल्ल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदावर आहेत. माल्ल्यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षांत कंपनीची विक्री ८०० कोटी रुपयांवरुन २००० कोटी रुपयांवर पोहचली. तर समभागांची किंमत १६५५ रुपयांवरुन ४३५८ रुपये झाली. तर बाजार भांडवलात तिप्पट वाढ झाल्याचे सनोफीचे मुख्य अधिकारी शैलेश अय्यंगार यांनी सांगितले.

Leave a Comment