‘रिंगिंग बेल्स’वर फसवणुकीचा गुन्हा

ringing-bells
नवी दिल्ली – देशातील कोटय़वधी जनतेची फक्त २५१ रुपयामध्ये मोबाईल देण्याचा दावा करून बोळवण करणा-या रिंगिंग बेल कंपनीवर अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर नोएडातील एका पोलीस स्थानकामध्ये कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि त्यांच्या अधिकाऱयांवर भारतीय दंड विधान कलम ६६ आणि आयटी कलम ६६च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे खाते जप्त करण्याची मागणी तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. कंपनीने २५१ रुपयांमध्ये मोबाईल देण्याचा दावा करून मोठा प्रचार केला आणि लोकांकडून मोठय़ा प्रमाणात रक्कम जमा केली. मेक इन इंडिया आणि कौशल्य योजनेच्या नावावर कंपनीवर चुकीचा प्रचार केल्याचा कंपनीवर आरोप ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment