‘मर्सिडीज’ची ‘सी क्लास २५० डी’ भारतीय बाजारात

benz
मुंबई: आलिशान कार बनविण्यासाठी विख्यात असलेल्या ‘मर्सिडीज बेंझ’ या कंपनीच्या ‘सी क्लास २५० डी’ या नव्या मॉडेलच्या कारचे भारतीय बाजारपेठेत आगमन झाले आहे. या गाडीची किंमत ४४ लाख ३६ हजार रुपये आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ‘मर्सिडीज बेंझ’वर असलेला ग्राहकांचा विश्वास याच्या आधारे ‘सी क्लास २५० डी’ला भारतात चांगला प्रतिसाद मिळेल; असा विश्वास ‘मर्सिडीज बेंझ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक रोलँड फोल्गर यांनी व्यक्त केला.

‘मर्सिडीज’च्या ‘सी क्लास’ गाड्या सध्या भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय आहेत. सी २०० (पेट्रोल) आणि सी २०० (डीझेल) या कंपनीच्या ग्राहकांनी पसंतीची मोहोर उठविलेल्या गाड्यांना भारतातही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता भारतीय बाजारपेठेत आलेल्या ‘सी क्लास २५० डी’चे उत्पादन ‘मर्सिडीज’च्या पुण्यातील प्रकल्पामध्ये केली जात आहे. या गाडीमध्ये अत्याधुनिक ९ जी ट्रान्स्मिशन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘मेबॅक’ सारख्या महागड्या गाड्यांमध्ये केला जातो.

भारतातच बनविलेल्या या गाड्यांबद्दल ग्राहकांना अधिक आत्मीयता वाटेल; असा विश्वास फोल्गर यांनी व्यक्त केला. मागील वर्षी ‘मर्सिडीज’ने भारतात १३ हजार ५०२ गाड्यांची विक्री केली. सन २०१४ मध्ये ही संख्या १० हजार २०१ होती.

Leave a Comment