एप्रिलपासून ’ होंडा’ च्या मोटारी महागणार!

honda
नवी दिल्ली – होंडा कार इंडिया पुढील महिन्यापासून आपल्या मोटारींच्या किंमत ६,००० रुपयांची वाढ करण्याची योजना करीत आहे. परदेशी विनिमय दराचा उत्पादन खर्चावर होणारा प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी कंपनीने मोटारींच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून भारतात मोटारींच्या सहा मॉडेल्सची विक्री केली जाते.

कंपनीची प्राथमिक व सर्वात स्वस्त ‘मोटार ब्रायो‘ ४.३१ लाख रुपयांची आहे. एसयुव्ही सीआरव्ही ही सर्वात अत्याधुनिक व महागडी मोटार २६ लाख रुपयांना उपलब्ध आहे. परदेशी विनिमय दराचा उत्पादन खर्चावर होणारा प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मोटारींच्या सर्वच मॉडेल्सच्या किंमतीत वाढ करण्याची योजना करीत आहोत.‘, अशी माहिती कंपनीच्या एका प्रवक्त्याने दिली आहे.

परंतु प्रत्येक मॉडेलच्या किंमतीत किती वाढ होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. चालू महिन्याच्या सुरुवातीलाच कंपनीने आपल्या सर्व मोटारींच्या किंमतीत ७९,००० रुपयांची वाढ घोषित केली होती. केंद्रीय अर्थसंकल्पात वाहन उद्योगावर इन्फ्रास्ट्रक्चर सेसची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे सर्वच मोटार कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ केली होती.

Leave a Comment