अ‍ॅपल वॉचच्या किंमतीत मोठी कपात

apple
सॅन फ्रान्सिस्को – येथील कूपरटिनोमध्ये पार पडलेल्या अ‍ॅपल इव्हेंटमध्ये अ‍ॅपल वॉचच्या किंमतीत कपात केल्याची घोषणा करण्यात आली आहे. २३ हजार २०० रुपयांपासून सुरुवात होणा-या अ‍ॅपल वॉचची किंमत आता २० हजार ५०० रुपयांपासून सुरु होणार आहे. या कार्यक्रमात अ‍ॅपलने वॉचचे चार नव्या रंगातील व्हेरिएंटही लॉन्च केले.

अ‍ॅपल कंपनी यंदा नवे अ‍ॅपल वॉच लॉन्च करणार असल्याचीही माहिती मिळते आहे. यावेळी अ‍ॅपल कंपनीने स्पोटर्स बँड आणि लेदर बँडही लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे हे बँड विविध रंगांमध्ये उपलब्ध असणार आहेत.यासोबतच अ‍ॅपल कंपनीने नवा वूवन नायलॉन बँड लॉन्च केला आहे. हा बँड चार लेयरमध्ये बनला आहे. याची किंमत ४९ डॉलर ठेवण्यात आली आहे.

वॉच यूजर्समध्ये वॉचचे बँड बदलणे एकप्रकारचे ट्रेण्ड बनत चालले आहे, त्यादृष्टीनेच आम्ही नव्या बँडचे लॉन्चिंग केले आहे, असे अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांनी अ‍ॅपल इव्हेंटमध्ये सांगितले. त्याचसोबत, अ‍ॅपल वॉच जगात सर्वात जास्त विक्री होणार स्मार्ट वॉच असल्याचे सागंयलाही कूक विसरले नाहीत.

Leave a Comment