ओपेलची कन्सेप्ट जीटी फ्यूचर कार

opelgt
जिनिव्हा येथील ऑटो शेा मध्ये ओपेल ने त्यांची जीटी कन्सेप्ट कार सादर केली असून या कारने अनेक प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवण्यात यश मिळविले आहे. प्रथमदर्शनी पाहताच लक्षात येणार्‍या गोष्टी म्हणजे या कारच्या दरवाजांना हँडल्स नाहीत. एक्स्टिरियर डोअर मिरर नाहीत पण इतकेच काय विंड शिल्ड वायपर्सही नाहीत.

दुसरी चटकन लक्षात येणारी बाब म्हणजे लाल रंगाचा अतिशय कल्पकतेने केलेला वापर. कारच्या पुढच्या चाकातही हा लाल रंग वापरला गेला आहे व त्यामुळे कारला खास लूक मिळाला आहे. कारचे बॉनेट लांबलचक आहे पण टेलगेट मात्र जवळ जवळ नाहीच. या कारचे इलेक्ट्रीक दरवाचे उघडताच आतील लाल रंगाची ड्रायव्हरसीट व मस्त डॅशबोर्ड लक्षवेधक आहेतच पण इंटिरीयरमध्ये अॅल्युमिनियमचा भरपूर वापर केला गेला आहे. फ्रंट मिड इंजिन टर्बोचार्जर व रियर व्हिल ड्राईव्ह मुळे या कारला स्पोर्टी लूक मिळाला आहे.