ऑनलाईन शॉपिंगमध्ये ७८ टक्क्यांची वाढ!

online-shopping
नवी दिल्ली : भारतात यंदाच्या वर्षात ऑनलाईन शॉपिंगमध्ये ७८ टक्के वाढ होईल असे संकेत असोचेम आणि प्राईस वॉटर हाऊस कूपर्स यांनी संयुक्तपणे कलेल्या सर्वेक्षणानुसार मिळाले आहेत. ऑनलाईन कंपन्या देत असलेल्या आकर्षक ऑफर्स आणि आक्रमक मार्केटिंग व त्याचबरोबर पुस्तकांपासून कपड्यांपर्यंत आणि दागिन्यांपासून इलेक्टॉनिक गॅजेटपर्यंत असा सर्व माल ऑनलाईन शॉपिंगवर मिळत असल्याने मंदी असूनही या व्यवसायात भक्कम वाढ होत असल्याचे निरीक्षणही नोंदविले गले आहे.

गतवर्षी म्हणजे २०१५ मध्ये ऑनलाईन शॉपिंगमध्ये ६६ टक्के वाढ झाली होती ती यंदाच्या वर्षात ७८ टक्क्यांवर जाईल असे हा अहवाल सांगतो. असोचेमचे महासचिव डी.एस रावत या संदर्भात माहिती देताना म्हणाले, २०१५ साली ५.५० कोटी ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केली होती तो आकडा यंदा ८ कोटींवर जाईल. स्मार्टफोन टॅब्लेटच्या लोकप्रियतेतील वाढही ऑनलाईन व्यवसायांना पूरक ठरते आहे. इंटरनेट असलेल्या सर्व उपकरणांमुळे ऑनलाईन शॉपिंग सोपे बनले आहे. त्यामुळे या व्यवसायाचा विस्तार वेगाने होत आहे आणि भारतीयांना शॉपिंगची ही पद्धत भावली आहे. या शॉपिंगमधील ११ टक्के शॉपिंग हे मोबाईलच्या सहाय्याने होते आहे हे प्रमाण २०१७ पर्यंत २५ टक्क्यांवर जाईल.

सध्या ई कॉमर्सची उलाढाल २५ अब्ज डॉलर्सवर आहे ती येत्या पाच वर्षात १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल असेही रावत यांनी सांगितले. ई-कॉमर्स व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. या व्यवसायाचा विस्तार होत आहे. ऑनलाईन खरेदीला भारतीयांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अहवालात म्हटले आहे की, ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून सध्या ३५ टक्के विक्री संगणक, इेलेक्ट्रॉनिक साहित्य, कपडे आणि विविध अ‍ॅसेसरीजचा समावेश आहे. २०१६ मध्ये याच्या विक्रीत वाढ झाली असून ही वाढ पुढे ४० टक्केंपर्यत वाढण्याची शक्यता आहे. तब्बल ११ टक्के शॉपिंग स्मार्ट फोनच्या माध्यमातून केली जात आहे. पुढील वर्षी एकूण ऑनलाईन शॉपिंगपैकी २५ टक्के शॉपिंग स्मार्ट फोनच्या माध्यमातून होण्याची अपेक्षा या उद्योगांना आहे. सध्या देशातील ई कॉमर्स उद्योग २५ टक्के अब्ज डॉलरचा आहे.

Leave a Comment